Wednesday, April 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भोसरी विधानसभा भाजपा बुथ संपर्क अभियान संयोजकपदी हनुमंत लांडगे

भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते निवड

शहर कार्यकारिणीच्या बैठकीत बुथ सशक्तीकरणाचा संकल्प

पिंपरी चिंचवड
: भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ सक्षमीकरण करण्यावर भर दिला जात आहे. भोसरी विधानसभा मतदार संघाच्या बुथ संपर्क अभियानाच्या संयोजकपदी कामगार नेते हनुमंत लांडगे यांची निवड करण्यात आली.

पिंपरी-चिंचव भाजपा शहर कार्यकारिणीची बैठक मंगळवारी मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसपंर्क कार्यालयात झाली. यावेळी हनुमंत लांडगे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, शहर सुधारणा समितीचे माजी चेअरमन राजेंद्र लांडगे, उत्तम केंद्ळे, सरचिटणीस विजय फुगे, दिनेश यादव, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष संतोष तापकिर, निगडी-चिखली मंडलाध्यक्ष महादेव कवितके, भाजपाचे शहर पदाधिकारी ज्ञानेश्वर नागरगोजे, दत्तात्रय गव्हाणे, अर्जुन ठाकरे, संजय पटनी, शिवराज लांडगे, संजय गायकवाड, योगेश लांडगे, सारीकाताई चव्हाण, किसन बावकर, पांडूरंग साने, निखिल बो-हाडे, संजय परळीकर, सुमित शिंगाडे आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, हनुमंत लांडगे यांची भोसरी विधानसभा बुथ संपर्क अभियानच्या संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. भोसरी विधानसभा क्षेत्रातील ४१८ बुथ सशक्तीकरणाचे कार्य ते जोमाने करतील असा विश्वास आहे.

हनुमंत लांडगे पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत

हनुमंत लांडगे हे स्थापनेपासून भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, मुख्य प्रवक्ते पिंपरी-चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेचे चेअरमन अशी पदे भूषविली आहेत. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी, कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस तथा सोशल मिडिया प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

– क्रांतिकुमार कडुलकर

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles