मंचर : शिरूर लोकसभा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून अवसरी बुद्रुक येथील वरची टाव्हरेवाडी घुली येथे 20 लक्ष रुपये रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली. या वेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक अजित चव्हाण, शिवसेना शेतकरी सेना उपजिल्हाप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य कल्याण हिंगे, मा.ग्रा.पं. सदस्य स्वप्निल हिंगे, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख व मा.ग्रा.पं. सदस्या मनीषाताई फल्ले, अवसरी बुद्रुकच्या सरपंच सारिका हिंगे, उपसरपंच अनिल हिंगे, मनीषाताई हिंगे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत गुणगे, स्मिता चव्हाण, ज्येष्ठ शिवसैनिक मच्छिंद्र टाव्हरे, जयसिंगराव हिंगे, सचिन रमेश कुमार हिंगे, प्रभाकर हिंगे, दिलीप हिंगे, अंकुशराव टाव्हरे, उत्तम शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
2004 साली पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर आढळराव पाटलांच्या माध्यमातून अवसरी बुद्रुक मध्ये पहिला खासदार फंड हा देखील घुलीसाठी आलेला होता. श्री.खंडोबा मंदिराचा सभामंड शिवाजीराव पाटीलांच्या माध्यमातून झालेला आहे. व आज देखील घुली ग्रामस्थांच्या मागणीनुसार या रस्त्यासाठी 20 लाख रुपयांचे काम आज सुरू झाले.