Wednesday, September 18, 2024
HomeNewsभूल भुलैया 2 चित्रपटाचा जलवा ; कोट्यावधी रुपयांचा जमवला गल्ला !

भूल भुलैया 2 चित्रपटाचा जलवा ; कोट्यावधी रुपयांचा जमवला गल्ला !

 

पुणे : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा  ‘भूल भुलैया 2’  हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

त्याच्या या चित्रपटाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. 20 मे रोजी भूल भूलैय्या-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं वीकेंडला जबरदस्त कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 14.11 कोटींची कमाई केली. आता शनिवारी (21 मे) आणि रविवारी (22 मे) देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

भूल भूलैय्या-2 या चित्रपटानं आत्तापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. भूल भूलैय्या-2 नं शनिवारी (22 मे) या चित्रपटानं 18.34 कोटींची कमाई केली असून रविवारी म्हणजेच रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली.

भूलै भूलैय्या- 2 या चित्रपटानं यावर्षी रिलीज झालेल्या काही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचं तसेच बच्चन पांडे आणि द कश्मीर फाइल्स या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड देखील या चित्रपटानं तोडले आहे. हा हॉरर कॉमेडीवर आधारित असणारा हा चित्रपट प्रेक्षकांबरोबरच सेलिब्रिटींची देखील मनं जिंकत आहे.

लाल महालात लावणी करणे पडले महागात ; वैष्णवी पाटील ने मागितली जाहीर माफी !

टोमॅटो शंभरी पार ; शेतकरी सुखावला !

देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार, भाजपच्या जोर-बैठका सुरू !

संबंधित लेख

लोकप्रिय