मंगळवारी भाऊसाहेब भोईर यांनी प्रकट मुलाखत (Bhausaheb Bhoir)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भाऊसाहेब भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध भाषिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत शनिवार (३ ऑगस्ट) पासून मंगळवार (६ ऑगस्ट) पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खान्देशी, अहिराणी, राजस्थानी, बंगाली आणि दाक्षिणात्य भाषांधले सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सर्व कार्यक्रमांना रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. (Bhausaheb Bhoir)


कार्यक्रमाचे वेळापत्रक असे आहे:
शनिवार, ३ ऑगस्ट:
संध्याकाळी ५:३० – ‘बाघमाऱ्या’ खान्देशी नाटक (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
रात्री ९:०० – ‘एक शाम भोलेनाथ के नाम’ राजस्थानी भजन संध्या
रविवार, ४ ऑगस्ट:
दुपारी १२:३० – लोपामुद्रा यांच्या बंगाली गाण्यांचा ऑर्केस्ट्रा (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
संध्याकाळी ५:३० – ‘ए रात्रेग पगेल्गु यानु’ दक्षिण भारतीय ‘तुल्लू’ नाटक (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
सोमवार, ५ ऑगस्ट:
दुपारी १२:३० – ‘अहो नादच खुळा’ लावणी कार्यक्रम (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
संध्याकाळी ६:०० – ‘खेळ पैठणीचा’ मधुसूदन ओझा (चंद्र माऊली मंगल कार्यालय, वाकड)
मंगळवार, ६ ऑगस्ट:
दुपारी १२:३० – ‘शिवतांडव’ मराठी नाटक (निळू फुले नाट्यगृह, सांगवी)
संध्याकाळी ६:०० – भाऊसाहेब भोईर यांची प्रकट मुलाखत (प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह)
मुलाखतीनंतर – ‘द एवर ग्रीन किशोर कुमार’ हिंदी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा (प्रशांत साळवी)
यावेळी कार्यक्रमांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.