Thursday, March 28, 2024
Homeग्रामीणभारत बंद : बार्शीत किसान सभा, कम्युनिस्ट पक्षाकडून पोस्ट चौकात रस्ता रोको...

भारत बंद : बार्शीत किसान सभा, कम्युनिस्ट पक्षाकडून पोस्ट चौकात रस्ता रोको आंदोलन

बार्शी : संयुक्त किसान मोर्चा पुकारलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शी मेन पोस्ट चौक येथे रस्ता रोको आंदोलन कॉम्रेड प्रविण मस्तुद यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी निवेदन देण्यात आले.

शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा, स्वामीनाथन आयोग, 2019 – 20 चा पिक विमा, 2019 चा दुष्काळ निधी, पिक कर्ज, परदेशी सोयाबीनचे आयात बंद करून 2021 च्या अतिवृष्टी चे नुकसान भरपाई द्या, शेतीस दिवसा वीज पुरवठा व्हावा, घरेलू कामगार बांधकाम कामगार यांच्या मागण्या पूर्ण करा, कोरोना काळात वीजबिल माफ करा, सात हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला पेन्शन, एकवीस हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला किमान वेतन करा, आधारभूत किमत मिळण्याचा शेतकऱ्यांना अधिकार द्या, कोविड काळातील शैक्षणिक फीस माफ करा, पेट्रोल डीझेल दरवाढ रद्द करा, सार्वजनिक उद्योगांची कवडीमोल विक्री बंद करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा ! सोलापूर : कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्यासह शेकडो माकप च्या कार्यकर्त्यांना अटक

यावेळी झालेल्या भाषणामध्ये मोदी सरकारचा निषेध करून तीन कृषी कायदे मागे घ्यावे व शेतकरी वर्गाच्या मागण्या तातडीने मंजूर कराव्यात अशा घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रवीण मस्तुद, आयटकचे कॉम्रेड ए.बी.कुलकर्णी, अखिल भारतीय किसान सभेचे कॉम्रेड लहू आगलावे, भारत भोसले, उंबरे अण्णा, लक्ष्मण घाडगे, सरिता कुलकर्णी, अनिरुद्ध नखाते, शौकत शेख, आनंद गुरव, शुभम शिंदे, बालाजी शितोळे, आनंद धोत्रे, भारत पवार, भारत चव्हाण, सोमनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा ! कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी “या” दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश !


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय