Friday, March 29, 2024
Homeजिल्हाभामरागड : पद्मश्री आमटे दांपत्याच्या हस्ते पुस्तक विमोचन

भामरागड : पद्मश्री आमटे दांपत्याच्या हस्ते पुस्तक विमोचन

भामरागड : आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेमन मॅगसेसे व मानाचा पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुप्रसिद्ध समाजसेवी दांपत्य डॉ. प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते स्तंभलेखक डॉ.संतोष डाखरे यांच्या पुस्तकाचे विमोचन पार पडणार आहेत.

डॉ. संतोष डाखरे भामरागड येथील राजे विश्वेश्वरराव कला- वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींसह सामाजिक आणि आर्थिक विषयावर ते विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन करीत असतात. कोरोना काळातील जागतिक संदर्भ बदलून टाकणाऱ्या विविध घडामोडींवर भाष्य करणारे त्यांचे लक्षवेध नामक पुस्तक प्रकाशित झाले असून या पुस्तकाचे आभासी पद्धतीने विमोचन पद्मश्री आमटे दांपत्य 10 ऑक्‍टोबर रोजी करणार आहेत.

राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेच्या विदर्भ प्रांत अध्यक्षा डॉ.अलका देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पवार, डॉ. कमल सैनी (राजस्थान), डॉ. विवेककुमार हिंद (बिहार), डॉ. संपदा कुल्लरवार, डॉ. हेमराज लाड उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकाचे समीक्षण सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक डॉ. संदीप तुंडूरवार करणार आहेत.

आभासी पद्धतीने होणाऱ्या या प्रकाशन सोहळ्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजक डॉ.मंगेश आचार्य यांनी केले आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय