Thursday, August 11, 2022
Homeजिल्हासोलापूर : आजच्या शेतकरी कामगार आंदोलनाची प्रेरणा भगतसिंगांचीच - ऍड. एम. एच....

सोलापूर : आजच्या शेतकरी कामगार आंदोलनाची प्रेरणा भगतसिंगांचीच – ऍड. एम. एच. शेख

spot_imgspot_imgspot_imgspot_img

सोलापूर : आज देशभर जे शेतकरी आंदोलन आणि कामगार कायद्याविरोधात उभे असलेल्या आंदोलनाची प्रेरणा ही भगतसिंग आहे. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आणि विचारावर हा संघर्ष उभा आहे, असे मत ऍड. एम. एच. शेख यांनी शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त डीवायएफआय व एसएफआय च्या वतीने आयोजित अभिवादन सभेत व्यक्त केले.

आज शहीद भगतसिंग यांची जयंती डिवायएफआय व एसएफआय च्या वतीने साजरी करण्यात आली. यानिमित्त दत्त नगर कार्यालयात अभिवादन सभा पार पाडली. यावेळी जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, यांच्या हस्ते भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना शेख पुढे म्हणाले की, आजचा संघर्ष हा उद्याचा नवीन भारत निर्माण करेल जो भगतसिंग यांच स्वप्न होत ते स्वप्न या देशातील युवक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी हे पुर्ण करतील. भगतसिंग यांनी माणसाकडून माणसाचे शोषण होणार नाही नाही असा समाज निर्माण झाला पाहिजे हे स्वप्न होत. पण आज या स्वप्नाला इथली भाडंवली व्यवस्था धुळीस मिळवत आहे. त्याविरोधात आपण लढले पाहिजे. धर्म, जात, अंधश्रद्धा यांना भगतसिंग यांनी कधीच आपल्या जीवनात थारा दिली नाही. ते वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत आणि शेवटच्या क्षनापर्यंत त्यावर ठाम राहिले असे यावेळी कॉ शेख यांनी आपले विचार मांडले. 

यावेळी प्रास्थाविक जिल्हा सहसचिव दत्ता चव्हाण यांनी केले तर आभारप्रदर्शन मलेशम कारमपुरी यांनी केले.

त्यानंतर दुसरा कार्यक्रम कॉ गोदूताई परुळेकर नगर ‘ब’ येथे अभिवादन कार्यक्रम जयंती निमित्त डिवायएफआयच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी मोफत लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण मोहिम या भागात राबविण्यात आली. 

या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष अशोक बल्ला, जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी, विल्यम ससाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी बापू साबळे, हसन शेख, अकिल शेख, राहुल भैसे, गणेश भोईटे, असिफ पठाण,इलियास सिद्धीकी, श्रुतिका बल्ला, मधुकर चिल्लळ, नवनीत अंकम, दिनेश बडगू, ऋषिकेश कटके आदी उपस्थित होते.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय