Saturday, December 7, 2024
Homeराज्य"livestream" या धोकादायक लिंकवर तुम्ही ही क्लीक केले असेल तर सावधान !...

“livestream” या धोकादायक लिंकवर तुम्ही ही क्लीक केले असेल तर सावधान ! हे वाचा

मुंबई : देशातील तरुणांना वेड लावणारे आयपीएल सामने सुरू होऊन आठवडा झाला आहे, ही आयपीएल मॅच मोबाईलवर पाहण्यासाठी ‘हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पैसे देऊन पाहता येते मात्र अनेक लोक फ्री मध्ये पाहण्याच्या नादात धोकादायक लिंक आणि ऍप्लिकेशनचे बळी पडत आहेत.

सध्या अनेक ग्रुप वर Pink APP, Look Pink, Online Movies (profilist) तसेच NetFlix Free अश्या दोन लिंक व्हायरल होत आहे. या लिंक खतरनाक हॅकरच्या असल्याचा अंदाज आहे. Online Stream किंवा Live Stream या नावाने देखील या लिंक आहेत. “http://profilelist.xyz/?livestream” हा त्या वेबसाईटचा युआरएल आहे. या वेबसाईटवर गेल्यावर livestream हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून आपण नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म वरील कॅटेंट आपण फ्री मध्ये पाहू शकतो असे आमिष दाखविले जाते मात्र हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर फोन मध्ये कुठे गायब होते हे कळत नाही. 

असे धोकादायक आहे हे अ‍ॅप

हे ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते काही परवानगी मागतात त्यावेळी ते सांगतात की आम्ही तुमच्या सर्व नोटिफिकेशन वाचू शकतो त्यामध्ये तुमचे संपर्क नंबर, नावे तसेच मेसेज अशी सर्व वैयक्तिक माहिती देखील वाचू शकतो. यामुळे आर्थिक व्यवहाराचे मेसेज देखील ते पाहू शकतात त्यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. त्याबरोबर हे सूचना डिसमिस करण्यात किंवा त्यांच्यात असलेल्या अ‍ॅक्शन बटणावर ट्रिगर करण्यात सक्षम होईल तसेच या अ‍ॅपला त्रास देणाऱ्या किंवा बंद करण्याची आणि संबंधित सेटिंग्ज बदलण्याची क्षमता देखील असल्याचे त्यांनी परवानगी मागते वेळी धक्कादायक माहिती दिली आहे. हा ऑनलाइन फ्रॉड किंवा मोबाईल हॅकिंगचा देखील प्रकार असू शकतो.

आपोआपच होत आहेत मेसेज शेअर

ज्या लोकांनी या लिंकवर क्लीक केले आहे किंवा हे ऍप्लिकेशन डाउनलोड केले आहे त्यांच्या फोन वरून स्वतःहून व्हाट्सएपवर कोणतीही लिंक शेअर न करता आपोआपच या वेबसाईटची लिंक शेअर होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

अशी घ्या काळजी

अशा गोष्टी पासून दूर राहण्यासाठी फ्री सेवा देणाऱ्या कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर क्लीक करू नये, कोणत्याही गोष्टीची खातरजमा झाल्याशिवाय तिथे आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, सुरक्षित नसलेले कोणतेही ऍप्लिकेशन डाऊनलोड करू नये.

ज्यांच्या फोन मध्ये हे ऍप्लिकेशन डाउनलोड झाले आहे त्यांनी काय करावे

ज्या लोकांच्या फोन मध्ये हे ऍप्लिकेशन डाऊनलोड झाले आहे त्यांनी तात्काळ फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ते ऍप्लिकेशन अनइंस्टोल करून डिलीट करावे. तसेच ऍप्लिकेशनचा सर्व डेटा क्लीअर करावा.

संबंधित लेख

लोकप्रिय