Tuesday, September 17, 2024
Homeकृषीश्रमण फूड्स बारामती चे युवा उद्योजक रत्नदीप सरोदे यांना बेस्ट स्टुडंट स्टार्टअप...

श्रमण फूड्स बारामती चे युवा उद्योजक रत्नदीप सरोदे यांना बेस्ट स्टुडंट स्टार्टअप 2021 पुरस्कार !

 

चेंबर ऑफ ऍडव्हान्समेंट मुंबई तर्फे श्रमण फुड्स बारामतीचे युवा उद्योजक रत्नदीप सरोदे यांना नुकताच अन्नप्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.फळे आणि भाजीपाला निर्जलीकरण व्यवसाय आणि त्यातून ग्रामीण भागातील युवा उद्योजकांसाठी प्रेरणा या विषयासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शाश्वत शेती विकास प्रतिष्ठान कात्रज पुणे येथून कृषी उद्योजकाचे 45 दिवसांचे निवासी प्रशिक्षण घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. अल्पावधीतच हा व्यवसाय ग्रामीण भागातील तरुणांना मार्गदर्शन ठरेल या उंचीवर जाऊन पोचला.आतापर्यंत श्रमण फुड्स येथे विविध कृषी अधिकाऱ्यांची भेट झाली आहे. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी येथे प्रशिक्षणासाठी येत असतात. फूड सायन्स, बायोटेकनोलॉजी चे विद्यार्थी येथे प्रॅक्टिकल करण्यासाठी येत असतात.

श्रमन फुड्स चे युवा उद्योजक रोहन थोरात ,सागर मोरे, डॉ पवार सर, विद्या प्रतिष्ठानचे फूड सायन्स विभागाचे प्राध्यापक तुषार बोरसे आणि सुजाता पाटील मॅडम यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दूधाचे दर वाढले, शेतकऱ्यांना फायदा होणार !

कामाच्या वेळेत सरकारी कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कारणासाठी मोबाईल वापरण्यावर बंदी; न्यायालयाचे आदेश

संबंधित लेख

लोकप्रिय