Bengaluru : सायबर गुन्ह्यांचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीला चलाखीने फसवून त्याच्या बँक खात्यातून तब्बल 2.80 कोटी रुपये लंपास करण्यात आले आहेत. बंगळुरूमध्ये घडलेल्या या प्रकरणात बँकेचा कर्मचारी असल्याचा बनाव करून WhatsApp कॉलवरून संपर्क साधण्यात आला आणि कुरिअरद्वारे फोन पाठवून हा प्रकार घडवण्यात आला. (Bengaluru cyber crime)
क्रेडिट कार्डच्या बहाण्याने फसवले
सायबर गुन्हेगाराने स्वतःला Citibank चा कर्मचारी असल्याचे सांगत व्यक्तीच्या पेंडिंग क्रेडिट कार्ड अर्जाच्या मंजुरीसाठी कॉल केल्याचा दावा केला. त्यानंतर व्यक्तीला बनावट प्रोसेस सांगून गोंधळात टाकले.
कुरिअरने पाठवला स्मार्टफोन
सायबर गुन्हेगारांनी व्यक्तीला नवीन सिम कार्ड खरेदी करण्यास सांगितले आणि नंतर कुरिअरद्वारे एक स्मार्टफोन पाठवला. या कुरिअरवर Citibank चे नाव वापरण्यात आले होते, त्यामुळे व्यक्तीने त्यांच्यावर विश्वास ठेवला.
फोनमध्ये होते धोकादायक अॅप्स
त्यांनी सिम कार्ड त्या फोनमध्ये टाकण्यास सांगितले. व्यक्तीला हे माहित नव्हते की त्या फोनमध्ये आधीच Malicious Apps (धोकादायक अॅप्स) इन्स्टॉल केलेले होते, जे डेटा चोरी आणि मोबाईल हॅकिंगसाठी वापरले जातात.
बँक डिटेल्स आणि OTP चा चोरीने एक्सेस
व्यक्तीने सिम कार्ड फोनमध्ये टाकताच, त्या धोकादायक अॅप्सने काम सुरू केले आणि बँक डिटेल्स तसेच OTP चा गुप्तपणे एक्सेस घेतला. गुन्हेगारांनी बँक खात्यातील रक्कम, सेव्हिंग्ज आणि एफडी तोडून एकूण 2.80 कोटी रुपये लंपास केले.
नवीन ट्रेंड – काळजी घेणे आवश्यक
सायबर गुन्हेगार आता फोनमध्ये फेरफार करून त्यात धोकादायक अॅप्स इन्स्टॉल करतात. हे फोन विक्टिमकडे कुरिअरने पोहोचवले जातात. विक्टिमने सिम कार्ड टाकताच बँक डिटेल्स आणि OTP यांचा एक्सेस मिळवून बँक खात्यातून पैसे चोरले जातात. (Bengaluru cyber crime)
पोलिसांत तक्रार दाखल
बंगळुरूमधील व्यक्तीला जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्यांनी तातडीने बँक आणि पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तक्रार दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Bengaluru cyber crime : सायबर गुन्हेगारांचा नवीन फंडा, कुरिअरने घरात पाठवला फोन आणि बँक खात्यातून लंपास केले 2.80 कोटी रुपये
- Advertisement -