Saturday, April 20, 2024
Homeजिल्हाआकुर्डीत पालखी अगमनापूर्वी विकास कामांसाठी तरतूद करावी - राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

आकुर्डीत पालखी अगमनापूर्वी विकास कामांसाठी तरतूद करावी – राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पिंपरी चिंचवड : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी पुढील महिन्यात २१ जून ला शहरात येत आहे. दरवर्षी पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असतो या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस इखलास सय्यद, महिला उपाध्यक्ष आशा शिंदे, महिला सरचिटणीस विमल गायकवाड यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन पालखी आगमनापूर्वी आकुर्डीतील विविध विकास कामे मार्गी लावावीत, यासाठी भरीव तरतूद करावी अशी मागणी लेखी निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, येत्या २१ जून रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी आकुर्डी येथे येत आहे. सदर पालखी येण्यापूर्वी प्रभागातील स्थापत्य व आरोग्य विषयक तसेच इतर किरकोळ कामे होणे आवश्यक आहे. परंतु ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाकडे आर्थिक तरतूद नसल्याने कामांना चालना मिळत नाही. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती (पुणे) येथे थेट मुलाखतीद्वारे मोठी भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी आम्ही स्वतः २८ मार्च, ११ एप्रिल व २५ एप्रिल २०२२ रोजी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय मुख्य समन्वयक तथा शहर अभियंता श्रीकांत सावने यांना पत्राद्वारे संपर्क साधून सूचित केले असल्याचे म्हटले आहे.

 

त्या प्रमाणे काही अंशी कामे झाली आहेत. परंतु स्थापत्य विषयक अद्यापही काही कामे करणे आवश्यक आहे, त्यासाठी तरतूद नसल्याने कामे पूर्ण झाली नाही. तरी आगामी पालखी सोहळा पाहता पालखीचे पूर्व तयारी म्हणून वारकरांसाठी निवास, मांडप, यासह परिसरातील स्थापत्य विषयक कामांसाठी त्वरित तरतूद मिळणे बाबत विचार व्हावा. म्हणजे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून उर्वरित कामे करून घेता येईल. तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खालील कामांना गती द्यावी.

महागाई, बेरोजगारी व जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर शेतकरी कामगार संघटना आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची हाक

मागण्या पुढीलप्रमाणे :

१. पालखी बरोबर येणाऱ्या दिंड्याची निवासी व्यवस्था करण्यात यावी. 

२‌. सदर दिवशी पिण्याच्या पाण्याचे टँकरची व्यवस्था करण्यात यावी.

३. पालखी बरोबर येणारे वारकरी व भक्तांसाठी ‘फिरते शौचालय ‘ विविध ठिकाणी उभी करण्यात यावी. 

४. भटक्या श्वानांचा बंदोबस्त व रस्त्यावरील खड्डे बुजविणे.

 ५. प्रभाग क्र.२१ ची संपूर्ण स्वछता तसेच जागो – जागी पावडर व औषध फवारणी मारणे. 

६. सायंकाळचा पाणी पुरवठा सुरु ठेवणे.

७. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता घेणे बाबत विद्युत विभाग सतर्क ठेवणे तसेच महावितरण विभागाशी संपर्क साधने. 

८. सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वछता करणेकरिता चोवीस तास सोय करणे

९. पालखी नंतर  दि. २३ जुन २०२२ रोजी संपूर्ण प्रभाग स्वछ करणे बाबत आरोग्य विभागाला सूचित करणे.

– क्रांतिकुमार कडुलकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा रूग्णालय, उस्मानाबाद येथे रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 24 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय