Wednesday, August 17, 2022
Homeजिल्हाबीड : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रास्ता रोको आंदोलन

बीड : परळी तालुक्यातील सिरसाळा येथे रास्ता रोको आंदोलन

spot_imgspot_imgspot_imgspot_img

परळी / अशोक शेरकर : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये परळी तालुक्यातील सिरसाळा येथे बंद पाळण्यात आला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग 361 फ वरील सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबा आंबेडकर चौकात चक्काजाम करण्यात आला. यावेळी संयुक्त किसान सभेचे नेते कॉ. अजय बुरांडे यांनी उपस्थिती जन समुदायास संबोधीत केले.

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी मागील दहा महिन्या पासुन दिल्लीच्या सहा सिमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. लाखो शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत. आत्ता पर्यंत सहाशे पेक्षा जास्त आंदोलक शेतकऱ्यांना प्राण गमावावे लागले आहेत. तरीही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत विचार करीत नाहीत. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने सोमवारी दि. २७ भारत बंद ची हाक दिली होती.

हेही वाचा ! सोलापूर : कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्यासह शेकडो माकप च्या कार्यकर्त्यांना अटक

महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ. अजय बुरांडे यांच्या  सह संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाहतूक खोळंबली

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 फ वरील सिरसाळा येथील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात रास्ता रोको करण्यात आल्याने बीड व परळीकडे वाहतूक करणारे अनेक वाहने अडकून पडली.

हेही वाचा ! कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी “या” दिवशी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय