Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बीड : स्वातंत्र्यसैनिक माजी खासदार गंगाधर अप्पा बुरांडे स्मृतीदिनी अभिवादन !

---Advertisement---

---Advertisement---

अंबेजोगाई / अशोक शेरकर : बीड जिल्ह्याचे माजी खासदार, स्वातंत्र्यसैनिक, किसान सभेचे नेते कॉम्रेड गंगाधर अप्पा बुरांडे यांचा आज (दि.१ ऑक्टो) तेरावा स्मृतिदिन, त्यानिमित्त साडेश्वर विद्यालय, चनई येथे स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आले.

त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएफआयचे जिल्हा कमिटी सदस्य तथा पत्रकार देविदास जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण होते. 

यावेळी बोलताना जाधव यांनी  सांगितलेली, कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांचा जन्म खेड्यागावात एका शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी हैद्राबादला उस्मानिया विद्यापीठात गेले, तेथे शिक्षण घेत असतानाच सामाजिक, राजकिय चळवळीच्या जवळचा संबंध आला. चळवळीच्या जवळीकतेमुळे ते चळवळीत सक्रीय झाले. 

स्वातंत्र्याचा लढा, निजामविरोधी लढा, सयुंक्त महाराष्ट्राचे आंदोलन, मराठवाडा मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम यात त्यांनी स्वतःहाला झोकून दिले, त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगवास ही झाला. कॉ. अप्पांनी ज्या समाजवादी भारताचे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्यानतंरीही ते संघर्ष करित राहिले.   

          

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर, गोरगरीब, दीनदलिताच्या मुलभूत हक्कासाठी त्यांच्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांनी अनेक लढे व आंदोलन उभी केली. किसान सभेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या प्रश्नासाठी त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत काम केले.

यावेळी मुख्याध्यापक चव्हाण यांनी आप्पांच्या  लाभलेल्या सहवास आणि कार्याबाबत विद्यार्थ्यांना अनुभव सांगितले. याप्रसंगी . प्रशांत मस्के, बोकण, विद्यार्थिनी उमंग बुरांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

आचल गायकवाड, कोमल अवाड या विद्यार्थिनीने स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक काकडे यांनी केले. तर सूत्र संचलन अनिकेत चव्हाण, ज्ञानेश्वर गोड यांनी केले. आभार वैष्णवी पवार या विद्यार्थिनीने मांडले.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles