Wednesday, April 17, 2024
Homeराज्यबीड : आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा केला होता प्रयत्न

बीड : आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, उपमुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा केला होता प्रयत्न

बीड, दि. १८ : आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे या मागणीसाठी आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये महिला व कर्मचारी किरकोळ जखमी झाल्या असून लाठीचार्जचा कर्मचाऱ्यांनी निषेध केला आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांंमधील डॉक्टर्स, स्टाफ नर्स, वार्ड बॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर व अन्य कर्मचारी यांना कायम करा , या मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले. कर्मचाऱ्यांना कायम केले नाही तर हा उद्रेक आणखीन मोठा होऊ शकतो, असे लहू खारगे यांनी सांगते.

या आंदोलनात आज डीवायएफआयचे  नेते मोहन जाधव, कोविड कर्मचारी नेते संभाजी सुर्वे, सारिका उडान, अनिता पाटील व हजारो सहकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय