बारामती : बारामती येथील औद्योगिक क्षेत्रातील आयएसएमटी कामगार संघटनेच्या वतीने कामगार दिन जल्लोषात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संघटनेच्या वतीने मान्यवरांचा कामगार कायद्याची पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला. कामगार दिनाचे महत्त्व आणि कामगार चळवळीचे योगदान याविषयीची माहिती प्रास्ताविकात जनरल सेक्रेटरी गुरुदेव सरोदे यांनी दिली.
Nokari : भारतीय टपाल विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, 7 मे शेवटची तारीख
कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांच्या फॅमिलीसह आपण एकत्र येऊन कामगार दिन साजरा करीत आहोत ही आनंदाची बाब आहे. असे मत संघटनेचे अध्यक्ष कल्याण कदम यांनी व्यक्त केले. कामगार चळवळी मधून कामगारांचे नेतृत्व उदयास येते व ते नेतृत्व कामगारांना न्याय ,समता देणारे असेल तर कामगारांना न्याय मिळतो .असे मत कामगार नेते शिवाजीराव खटकाळे यांनी व्यक्त केले. कंपनी आर्थिक संकटातून बाहेर पडत असताना कामगार व त्यांच्या फॅमिली चे खूप मोठे योगदान आहे. असे प्रतिपादन कंपनीचे प्लांट हेड श्री किशोर भापकर साहेब यांनी केले.
त्यानंतर कामगारांच्या फॅमिलीसाठी आणि मनोरंजनासाठी गावरान फिल्म प्रस्तुत चांडाळ चौकडी च्या करामती हा कार्यक्रम सादर करण्यात आला. उपस्थितांसाठी स्वादिष्ट मेजवानी चे आयोजन संघटनेच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष कल्याण कदम, जनरल सेक्रेटरी गुरुदेव सरोदे, उपाध्यक्ष शिवाजी खामगळ, खजिनदार रवींद्र गिरमकर, सल्लागार संतोष साळवे, सल्लागार रमेश लोखंडे, सदस्य सुरेश दरेकर, सदस्य संजय सस्ते, सदस्य सुनील पोंद्कुले यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी कामगार बंधूंनी प्रचंड प्रतिसाद दिला.
विशेष लेख : आद्यक्रांतिवीर शहीद राघोजी भांगरे एक झंझावात
टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 50000 हजार रूपये पेक्षा जास्त पगार