Friday, March 29, 2024
Homeग्रामीणबारामती : तांदुळवाडी गावात कृषिदूतांचे आगमन

बारामती : तांदुळवाडी गावात कृषिदूतांचे आगमन

तांदुळवाडी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत, कृषी महाविद्यालय, सोनई येथील अंतिम वर्षात शिकत असलेला विद्यार्थी राजरत्न महेंद्र सरोदे यांचे बारामती तालुक्यातील तांदुळवाडी गावांमध्ये आगमन झाले.

यावेळी नगरसेविका ज्योती भारत सरोदे, सरपंच जय पाटील व ग्रामस्थ चंद्रकांत यादव, रवींद्र सरोदे, ऋत्विक सरोदे, राजेंद्र गायकवाड, तन्मय सरोदे, पंकज सरोदे, कल्पना सरोदे, सायली सरोदे, प्रशांत इंदुलकर, बापू गायकवाड व बापू यलमार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

राजरत्न सरोदे हा अंतिम वर्षातील विद्यार्थी असून ग्रामीण कृषी कार्यक्रम, कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत प्राचार्य. डॉ. एच. जी. मोरे कार्यक्रम मार्गदर्शक प्रा. एस. ई. गायकवाड, प्रा. एस. एन.दरंदले तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील पीक लागवड, पद्धती शेती पद्धती, आधुनिक शेतीची माहिती बळीराजा वित्तीय पुरवठा करणारी सहकारी वित्त संस्थांची कार्यक्रम पद्धती, पीक प्रात्यक्षिके तसेच इतर शेती संबंधी माहिती गोळा करणार असून शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करणार आहे.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय