नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्ट 2021 महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी केली होती. आता या महिन्यात फक्त चार सुट्ट्या बाकी आहेत. या महिन्यात एकूण 15 सुट्ट्या होत्या. कॅलेंडर महिना जसजसा पुढे सरकत गेला, तशा सुट्ट्या आल्या आणि गेल्या. आता या महिन्यात फक्त चार सुट्ट्या बाकी आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत बँका बंद राहतील. या काळात ऑनलाईन बँकिंग सेवा आणि एटीएम सेवा कार्यरत राहतील.
हे पण पहा ! आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन !
राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्टीची यादी जारी !
आरबीआय स्थानिक सणांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या झोनसाठी बँक सुट्टीची यादी जारी करते. RBI ने या आठवड्यात बँकांमध्ये 4 दिवस सुट्टी निश्चित केलीय. ही सुट्टी प्रत्येक राज्यातील बँकांसाठी नाही.
हे पण वाचा ! १९ विरोधी पक्षांची भारतीय जनतेला हाक ! केले संयुक्त निवेदन सादर
30 ऑगस्टला अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार !
जन्माष्टमी / कृष्ण जयंती 30 ऑगस्ट 2021 रोजी आहे. या दिवशी अनेक शहरांतील बँका बंद राहतील. या दिवशी अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक या बँकांमध्ये कोणताही व्यवसाय होणार नाही. याशिवाय या महिन्याच्या चौथ्या शनिवारी 28 ऑगस्टला सुट्टी असेल. 29 ऑगस्टला रविवार आहे. यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील. त्याच वेळी 31 ऑगस्ट 2021 श्री कृष्ण जन्माष्टमीमुळे हैदराबादच्या बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
हे पण पहा ! भारताची विक्री थांबवा, जनतेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोचे आवाहन !
कोणत्या शहरांमध्ये बँका बंद राहतील?
1. 28 ऑगस्ट 2021 – चौथा शनिवार
2. 29 ऑगस्ट 2021 – रविवार
3. 30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी / कृष्ण जयंती (अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, जयपूर, जम्मू, कानपूर, लखनऊ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, श्रीनगर आणि गंगटोक)
4. 31 ऑगस्ट 2021 – श्री कृष्ण जन्माष्टमी (हैदराबाद)