Saturday, October 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : युवकांनी नकारात्मक भूमिका हद्दपार करा : प्रदीप लोखंडे

PCMC : युवकांनी नकारात्मक भूमिका हद्दपार करा : प्रदीप लोखंडे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज मध्ये सन 2024 25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आले होते, त्याचे उद्घाटन व्याख्याते प्रदीप लोखंडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. (PCMC)

यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते व्याख्याते प्रदीप लोखंडे, वी आर रासकर, वर्ल्ड नेटवर्किंग सर्विसेसच्या प्रतिनिधी सिरीन अली व्हिएतनामचे टांच यांच्या स्मृतिचिन्ह देऊन तर यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरती प्राचार्य डॉ. ए के वाळुंज उपप्राचार्य डॉ. क्षितिजा गांधी , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया आदी मान्यवर उपस्थित होते.

व्याख्याते प्रदीप लोखंडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, जागतिक पातळीवर आपला भारत देश प्रगती पथावर जात आहे चार वर्षे कठोर परिश्रम व शिक्षण ही जीवनाच्या आयसोसिटीची गुरुकिल्ली आहे याच्या विद्यार्थ्यांना विसर पडता कामा नये याचा ध्यास अंगीकारक सकारात्मक जीवनशैली आत्मसात करा जबाबदारी पासून दूर जाऊ नका स्वतःवर अपार विश्वास ठेवत हे संपादन करा ही जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण हेच काळाची गरज असून त्यापासून दूर जाऊ नका. नकारात्मक विचारसरणीमुळे स्वतःचे कुटुंबांचे पर्यायाने देशाचे नुकसान होते. युवकांनी परदेशाचे आकर्षण दूर ठेवून आपल्या भारत देशात काय चांगले आहे यापेक्षा आपल्या भारत देशाचा विकासासाठी कोणता हातभार लावता येईल याचा विचार करा.

संस्थेचे संस्थापक डॉ. दीपक शाह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आज विविध क्षेत्रात स्पर्धा असली तरी युवांना प्रचंड संधी देखील आहे मनात निश्चय करून अहंकार स्वतःविषयी बाळगू नका. पदवी घेऊन नोकरी करणारे फक्त होऊ नका स्वतःच्या व्यवसाय सुरू करून नोकरी देणारे बना. त्यासाठी तुम्हालाच पुढे यावे लागणार आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी जी मदत लागेल त्यासाठी शिक्षण संस्था तुमच्या पाठीशी असेल हे लक्षात ठेवा.

यावेळी व्याख्यात्या शिरीन अली, प्राचार्य डॉ. ए . कें वाळुंज, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ.जयश्री मुळे यांनी मनोगत व्यक्त केले राष्ट्रीय शिक्षण योजना 20-20, सायबर वॉरियर्सनी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत डॉ. रूपा यांनी केली सूत्रसंचालन डॉ. हर्षिता वाच्छानी तर आभार डॉ. श्रुती गणपुले यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय