ढाका : पंतप्रधान शेख हसिना सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर बांगलादेशच्या 1971 च्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानविरुद्ध लढलेल्या नातेवाईकांसाठी 30 टक्के सरकारी नोकऱ्या राखून ठेवणारी कोटा पद्धत संपवण्याच्या मागणीसाठी शेकडो आणि हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांनी 2018 नंतर पुन्हा आंदोलन सुरू केले. (Bangladesh)
ढाका विद्यापीठात प्रचंड हिंसाचार सुरू झाला. शुक्रवारी रात्रीच्या निदर्शनांमध्ये एकूण मृतांची संख्या 114 वर पोहोचली आहे. परिस्थिती गंभीर झाली. (Bangladesh)
बांगलादेशातील 64 पैकी 47 जिल्ह्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात जाळपोळ दगडफेक यामुळे 114 जण ठार, 2,500 आंदोलक आणि 300 पोलीस जखमी झाले आहेत. (Bangladesh)
या आंदोलनामुळे सुमारे 1000 भारतीय विद्यार्थी तेथून भारतात परतले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शनिवारी सांगितले की त्यांनी भारतीय नागरिकांच्या परतण्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था केली आहे. (Bangladesh)
नागरी विमान वाहतूक, इमिग्रेशन, लँड पोर्ट आणि बीएसएफ अधिकाऱ्यांशी समन्वय साधला. 778 भारतीय विद्यार्थी वेगवेगळ्या जमीन बंदरांवरून भारतात परतले आहेत, तर ढाका आणि चितगाव विमानतळांवरून नियमित विमानसेवेद्वारे सुमारे 200 विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. (Bangladesh)
बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये 56 टक्के आरक्षण आहे. यातील सर्वाधिक 30 टक्के आरक्षण हे 1971 च्या स्वातंत्र्यात लढ्यातील ‘मुक्तिवाहिनी’ च्या वारसदारांना देण्यात आले आहे. सलग 30 वर्षापासून वारसदारांना नोकऱ्यांमधील आरक्षण हटविण्याची आंदोलक मागणी करीत आहेत. (Bangladesh)
तर सध्या हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तेथील निकालाची प्रतीक्षा करावी, असे शेख हसिना यांच्या सरकारचे म्हणणे आहे.
“रॉयटर्स”च्या वृत्तानुसार, ढाका विद्यापीठात सोमवारी चकमकी सुरू झाल्या, 100 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. ढाक्याच्या बाहेर, सावर येथील जहांगीर नगर विद्यापीठात रात्रभर हिंसा पसरली आणि मंगळवारी संपूर्ण बांगलादेशात या हिंसाचाराचे लोण पसरले. (Bangladesh)
या आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक रेल्वे, बसेस, मेट्रो सेवा बंद ठेवण्यात आल्या. सरकारने इंटरनेट वर बंदी घालून सैन्याला रस्त्यावर उतरवले आहे, पुढील दोन दिवस कडक संचारबंदी जारी करण्यात आली आहे.