पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:मटणाचे दर सातशे पलीकडे गेल्याने खवय्यांची पसंती मच्छीला मिळत आहे. या समुद्रातील माशांबरोबरच धरणातील म्हणजे गोड्या पाण्यातील माशांना अधिक पसंती मिळत आहे.
गल्लोगल्ली चिकन मटण दुकाने असली तरी काळभोरनगर,शिवतेजनगर,स्पाईन रोड,चिखली,कृष्णानगर,आकुर्डी,चिंचवडगाव येथील तसेच शहराच्या विविध उपनगरातील फिशमॉल,फिश मार्केट,किरकोळ दुकानात समुद्री बांगडा व गोड्या पाण्यातील रोहू माशे खरेदीसाठी गर्दी वाढली आहे.
गोवा,मालवण समुद्रकिनारपट्टीवर बांगडा मासळी मोठ्या प्रमाणात मिळाल्यामुळे बंगड्याचे दर मागील वर्षीच्या तुलनेत 30 टक्के कमी झाले आहेत बांगडा आणि रोहू 140-180 दरम्यान किलोचा दर सर्वात कमी आहे.तज्ज्ञांनीही मटनापेक्षा मच्छी खाण्याचा सल्ला दिल्याने अलीकडे मच्छी खाणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
या कडक हिवाळ्यात मासे खाल्ले तर शरीराची प्रोटीनची गरज पूर्ण होऊन शरीराला ऊर्जा मिळते. या दोन्ही माश्यामध्ये व्हिटॅमिन डी चा मोठा स्रोत आहेत. माश्यांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स असतात जे आपल्या मेंदूच्या व संपूर्ण शरीराच्याच आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहेत.सुरमई,पोप्लेट,सरंगा,रावस ई माशे 700 ते 1100 रु किलोच्या आसपास असल्यामुळे नागरिक स्वस्त मस्त बांगडा,रोहू फिश रेसिपी बनवून खात आहेत.
घरोघरी बांगडा करी,मटण महाग-थंडीत बांगडा,रोहू माशांना मागणी वाढली
- Advertisement -