Sunday, December 8, 2024
HomeNewsबाळासाहेबांची सावली असलेल्या चंपासिंह थापा शिंदे गटात !

बाळासाहेबांची सावली असलेल्या चंपासिंह थापा शिंदे गटात !

मुंबई : शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. बाळासाहेबांची(Balasaheb Thackeray) सावली अशी ओळख असलेल्या चंपासिंह थापा(Champa Singh Thapa ) यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे.थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे.


चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.थापाचे मातोश्रीवर काही काम राहिलं नाही. तो बाळासाहेबांचा सेवक होता. तो गेला, का गेला? मला माहित नाही त्याला कोणी बोलवून घेतलं माहित नाही असं सावंत म्हणाले.त्याच्यावर काय अन्याय होता. त्याला काय राजकीय अभिलाषा होती का? बाळासाहेबांनी मुलासारखी सांभाळलेली ही माणसे आहेत.शिवसेनेतल्या अनेकांना फोन येत आहेत पैसे देतो या. विशेषत: शाखाप्रमुखांना अशा प्रकारच्या ऑफर दिल्या जात असल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय