पिंपरी चिंचवड : आकुर्डी येथील जगप्रसिद्ध बजाज ऑटो लिमिटेड कंपनी 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करून इलेक्ट्रिक वाहन (EV) कारखाना उभारणार आहेत. वार्षिक 5,00,000 इलेक्ट्रिक वाहने (EVs) तयार करण्याची आणि देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा करण्याची आणि परदेशात निर्यात करण्याची क्षमता असेल, असे कंपनीने एका प्रकाशनात म्हटले आहे.
इंधनाचे भाव वाढत असल्याने लोकांनी आता इलेक्ट्रिक (electric) वाहनांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आता बहुतांश कंपन्या आपली इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicle) सादर करत आहेत.
या 5 लाख चौरस फूट नवीन युनिटचे पहिले वाहन जून 2022 पर्यंत बाजारात येण्याची अपेक्षा आहे. या युनिटमध्ये सुमारे 800 लोकांना रोजगार मिळणार आहे. आकुर्डी हे मूळचे चेतक स्कूटर कारखान्याचे ठिकाण आहे.
बजाजचे मूळ उत्पादन चेतक स्कूटरचाही कारखाना आकुर्डीत आहे. बजाज ऑटोने सांगितले, की ते पुण्यातील त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) निर्मिती प्रकल्पात ‘प्रगत रोबोटिक आणि स्वयंचलित उत्पादन प्रणाली’ सेटअप करेल. बजाजने ईव्ही सेगमेंटमध्ये घेतलेल्या या उपक्रमामुळे ओला इलेक्ट्रिकला (ola Electric) जोरदार टक्कर मिळणार आहे.
बजाज आटो कंपनीला 8 डिसेंबर रोजी 60 वर्षे पूर्ण झाली. राहुल बजाज यांनी सुचवलेल्या “बुलंद भारत की बुलंद तस्वीर… हमारा बजाज” या ओळीने सुरू झालेल्या बजाज कंपनीने चेतक या स्कुटर्सची निर्मिती करून एक जागतिक इतिहास घडवला आहे. इलेक्टरीक स्कुटर्स,मोटर्स सायकल च्या मार्केट मध्ये देशामध्ये विविध ब्रँड मार्केटिंग करत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर वाहन निर्मिती क्षेत्रात अग्रेसर आहे. बजाज कंपनीच्या आकुर्डीतील कारखान्यामध्ये इलेक्टरीक वाहन निर्मिती जून 2022 पासून सुरू होईल. असे कंपनीने जाहीर केले आहे.