Friday, December 6, 2024
Homeग्रामीणऔरंगाबाद : गायरान जमीनीचा 7/12 उतारा आदिवासींना तात्काळ मिळावा : बिरसा क्रांती...

औरंगाबाद : गायरान जमीनीचा 7/12 उतारा आदिवासींना तात्काळ मिळावा : बिरसा क्रांती दल


केशव पवार यांची उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी

औरंगाबाद : कडुबा बारकू शेळके रा.कायगांव तालुका सिल्लोड यांना जमिनीचा 7/12 उतारा तात्काळ मिळावा अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष केशव पवार यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सिल्लोड यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांनी कडूबा बारकु शेळके रा.कायगांव (ता. सिल्लोड) यांच्याकडे मौजे कायगांव शिवारातील गट क्रमांक 78 मधील 2 हेक्टर  गायरान शेत जमीन कागदोपत्री अतिक्रमित केलेले आहे व ती जमीन नावाने होण्यासाठी मागणी केलेली आहे.

वरील आशयाचे पञ तहसीलदार सिल्लोड यांनी उपविभागीय अधिकारी यांना एकूण 7 कागदपञांच्या आधारे दिनांक 09 जून 2016 रोजी दिलेले आहे. 5 वर्षे होत आली तरी सदर पञानूसार अर्जदार कडुबा बारकू शेळके यांना अद्याप त्या जमिनीचा 7/12 उतारा मिळालेला नाही. ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे अर्जदारास अनेक अडचणी येत असल्याचे ही म्हटले आहे.

तरी कडूबा बारकू शेळके यांना तात्काळ सदर  जमिनीचा 7/12 उतारा देण्यात यावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय