Friday, November 22, 2024
Homeराष्ट्रीयAssam floods : मृतांची संख्या 18 वर; 5 लाखांहून अधिक लोक बाधित

Assam floods : मृतांची संख्या 18 वर; 5 लाखांहून अधिक लोक बाधित

गुवाहाटी : आसाममध्ये मागील दोन दिवसांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) नुसार पुरामुळे 14 जिल्ह्यांमध्ये 5 लाख 35 हजार 246 लोक प्रभावित झाले आहेत. 28 मे पासून आसाम मध्ये सर्वत्र महापूर आलेला आहे. मृतकांची संख्या 18 वर गेली असून काही लोक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली आहे. Flood situation is serious in Assam

राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे अनेक भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

कोपिली, बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत, हैलाकांडी, होजई, मोरीगाव, करीमगंज, नागाव, कचार, दिब्रुगढ, गोलाघाट, कार्बी आंगलाँग पश्चिम आणि दिमा हासाओ जिल्ह्यातील एकूण सहा लाखांहून अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.

नागाव हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा राहिला आहे. एकंदर 40 हजारांहून अधिक विस्थापित लोक विविध जिल्ह्यांतील मदत छावण्यांमध्ये आश्रय घेत आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि लोकांसह अनेक संस्थांद्वारे बचाव आणि मदत कार्य केले जात आहे. Assam news

राज्यातील आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने बाधित जिल्ह्यांमध्ये 193 मदत शिबिरे आणि 82 मदत वितरण केंद्र उभारली आहेत.

गुवाहाटी, गोलपारा आणि धुबरीमध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. कोपिली, बराक, धनसिरी, बुऱ्हिडीहिंग, गौरांग, कुशीयारा नद्यांची पाणीपातळीही वाढत आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

‘गाढवाचं लग्न’ मधील लोककलावंत प्रभा शिवणेकर यांचे निधन

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मत्स्यव्यवसाय विभागात भरती, पगार 2 लाखांपर्यत

सासरच्या मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

दुचाकीत साडीचा पदर अडकून पुण्यातील महिलेचा मृत्यु

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

संबंधित लेख

लोकप्रिय