Thursday, February 13, 2025

भारतीय विद्यार्थ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट एकाच वेळी !

रोमानिया : युक्रेन मधून भारतात परतण्यासाठी विद्यार्थी खूप प्रयत्न करत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये एकाच वेळी अस्मानी आणि सुलतानी संकटांना सामोरे जावे लागत आहे. 

युक्रेनमध्ये आधीच युद्धजन्य परिस्थिती आणि त्यात रोमानियाच्या बॉर्डर जवळ प्रचंड बर्फवृष्टी आणि रक्त गोठवणारी थंडी, अन्नधान्याचा कमी पुरवठा, बोर्डर वरुन पलिकडे जाण्यासाठी युक्रेनच्या सैन्याकडून भारतीय विद्यार्थ्यांची होणारी अवहेलना या सर्व कष्टदायी परिस्थिती मध्ये भारतीय विद्यार्थी मायदेशी जाण्यासाठी टाहो फोडत आहेत.

भारतीय दूतावासामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी आतापर्यंत तीन हजार विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणले आहे. अठरा हजार विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकून आहेत. त्यांची केंद्र सरकारने त्वरित सुटका करावी अशी मागणी विद्यार्थ्यांचे पालक करत आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles