Wednesday, April 24, 2024
Homeग्रामीणआशा वर्कर्स अंजना नरभवर यांच्या वारसांना कोरोना योध्या विमा मृत्यूचे 50 लाख...

आशा वर्कर्स अंजना नरभवर यांच्या वारसांना कोरोना योध्या विमा मृत्यूचे 50 लाख सुपूर्त

नंदुरबार : सुंदरदे गाव. तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार येथे आशा काम करीत असताना ढेकव पी एस सी. ता नंदुरबार जि.नंदुरबार येथील आशा वर्कर अंजना देविदास नरभवर वय. 54 वर्षे याचे दुुःखद निधन झाले. 5 एप्रिल रोजी आशा कोरोना पॉझिटिव्ह आली. गावात लसीकरण चे काम त्या करत होत्या. 7 एप्रिल रोजी शासकीय रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेल्या होत्या त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. सकाळी 9 वा. पासून विनवणी करत होत्या. त्यांचा त्रास वाढत होता. त्यांना दुपारी 2 नंतर ऍडमिट केले. 10 एप्रिल रोजी रात्री निधन झाले आहे. आशा ताई गावात सर्वांशी आपुलकी ने वागणाऱ्या होत्या. आशा संघटना च्या सर्व लढ्यात सहभागी होत होत्या.

कोरोना काळात आशा व गटप्रवर्तक गावपातळीवर 24 तास सेवा आरोग्य विभागाची बजावत असतांना मात्र कोरोना बाधित झाल्यावर आरोग्य सुविधा मिळत नाही. याचा आयटक संलग्न आशा व गट प्रवर्तक संघटना निषेध करीत आहे. कोरोना योध्या ना शासनाने 50 लाख रुपये चे विमा रक्कम आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना सातत्याने पाठपुरावा तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आशा जिल्हा कॉर्डिनेटर यांच्या पाठपुरावा मुळे मिळाली, अशी माहिती आशा व गटप्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले, राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड वैशाली खंदारेे, नंदुरबार चे आयटक नेते कॉम्रेड ईश्वर पाटील आयटक नेते यांनी दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय