Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आशा व गटप्रवर्तकांनी काळे वस्त्र धारण करून केले दिवसरात्र आंदोलन

नागपूर : २१ जानेवारी पर्यंत शासनाने जीआर न काढल्यास २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून २३ जानेवारी रोजी ११ वाजेपर्यंत सीआयटीयू संलग्न आशा व गटप्रवर्तक काळे वस्त्र धारण करून संविधान चौकात शासनाने घोषित केलेल्या दिवाळीचा निषेध करत काळी दिवाळी साजरी केली. 

---Advertisement---

मंदिर निर्मितीला आमचा विरोध नसून लाखो करोडो रुपये मंदिर बांधकामा करता खर्च करणाऱ्या केंद्र शासनाच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत आधी योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या. तसेच आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना राज्य शासनाने घोषित केलेल्या निर्णयाचा जीआर काढा. याकरता आंदोलन केल्या जात आहे. १२ जानेवारी पासून राज्यातील सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक परत जीआर करण्याच्या मागणी करतात संपावर आहेत. 

मागील संपाच्या दरम्यान आशा वर्कर व गटप्रवर्तक यांची मानधन कपात झाली असून राज्याचा निधी सुद्धा आजपर्यंत वाटप करण्यात आलेला नाही. मागील संप हा फक्त २३ दिवस चालला आहे. परंतु पूर्ण ऑक्टोबर महिन्याचे मानधन कपात करण्यात आलेले आहे. इतर निधी सुद्धा आशा वर्कर ला देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कार्यक्रमाला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष कॉ. राजेंद्र साठे यांनी आज मोदींनी घोषित केलेली दिवाळी ही काळी दिवाळी साजरी करण्याचा उद्देश आपल्या भाषणातून समजावून सांगितला. 

---Advertisement---

कार्यक्रमाला प्रामुख्याने राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, लक्ष्मी कोट्टेजवार, माया कावळे, आरती चांभारे, छाया दोडके, वनिता कोटांगडे, मासुरकर, रेखा पानतावणे, सरला मस्के, मोनिका गेडाम, अर्चना ठाकरे, प्रतिमा डोंगरे, वंदना बहादुरे सह शेकडो आशा वर्कर व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

(१) आशा व सुपरवायजर यांना ५ हजार दिवाळी बोनस द्या.

(२) गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.

(३) आशा – सुपरवायजर यांना ऑनलाइन डाटा एन्ट्री सक्ती करू नये.

(४) आशा व सुपरवायझर यांना किमान वेतन देण्यात यावे.

(५) आशा सुपरवायझर यांना कंत्राटी कर्मचारी प्रमाणे समायोजित करण्यात यावे.

(५) सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्कर ला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसर च्या सहीने देण्यात यावा.

(६) आशा सुपरवायझर यांना १५०० रु. महिना आरोग्य वर्धीनी निधी देण्यात यावा.

(७) शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये.

(८) लाभार्थीची माहिती सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच मागवण्यात यावी. इतर वेळेस मॅसेज  किंवा फोन करू नये.

---Advertisement---

(९) डेंग्यू, क्षयरोग, कुष्ठरोग कामाचा २०० रू.रोज देण्यात यावा.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles