Friday, April 26, 2024
Homeजिल्हाआशा व गटप्रवर्तकांचे खा. छत्रपती संभाजीराजे यांना साकडे, मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची मागणी

आशा व गटप्रवर्तकांचे खा. छत्रपती संभाजीराजे यांना साकडे, मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची मागणी

नाशिक, दि. २१ : आशा व गटप्रवर्तकांचे खा. छत्रपती संभाजीराजे यांना साकडे घालत संपाच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची मागणी केली आहे.

नाशिकला मराठा समाज मूक आंदोलन प्रसंगी कृती समितीचे निमंत्रक राजू देसले व आयटक संलग्नता महाराष्ट्र राज्य आशा व गट प्रवर्तक यांनी हे निवेदन. दिले. यावेळी प्रियदर्शनी निकम, प्रियंका निकम, लक्ष्मी पगारे, पुनम गोडसे, बेबी फडीळ, शांता घोळ, आशा झेंबाड, रविना साठे, ज्योती जाधव, पौर्णिमा गवळी, कविता पाळदे या उपस्थित होत्या.

■ आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

● आशा व गट प्रवर्तक ना किमान वेतन द्या.  

● महाराष्ट्र सरकार ने त्वरित  दरमहा मानधनात वाढ करावी.

● कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता राज्य सरकारने प्रतिदिन  300 रु आशा व गट प्रवर्तक ना द्या.

● आरोग्य विभाग ने कंत्राटी कर्मचारी चे सुसूत्रीकरण  करून वेतन वाढ केली. कंत्राटी पध्दतीने गट प्रवर्तक चा करार केला जातो. म्हणून गट प्रवर्तक चा समावेश सुसूत्रीकरनात करून कंत्राटी कर्मचारी इतके वेतन द्या.

● शासनाच्या नोकर भरतीत ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी प्रमाणे गट प्रवर्तक, आशा ना प्राधान्य देऊन, जिल्हा परिषद, मनपा नोकर भरतीत  जागा राखीव ठेवा.

● जननी सुरक्षा योजना (JSY) चा लाभ सरसकट द्या.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय