Friday, March 29, 2024
Homeजिल्हाआशा व गटप्रवर्तकांचा किमान वेतनाचा लढा तीव्र करण्याचा निर्धार

आशा व गटप्रवर्तकांचा किमान वेतनाचा लढा तीव्र करण्याचा निर्धार

प्रकाशा : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना जिल्हा अधिवेशन प्रकाशा येथे नंदुरबार जिल्हा चे संपन्न झाले. आशा व गटप्रवर्तकांना केंद्र सरकारने किमान वेतन 24 हजार रुपये लागू करा. गटप्रवर्तकांना किमान वेतन अधिक प्रवास भत्ता द्या, त्वरित कंत्राटी कर्मचारी दर्जा प्राप्त करून दरवर्षी मानधन वाढ करावी, वेतन सुसूत्रीकरण आरोग्य विभागात गटप्रवर्तकांचा समावेश करावा यासाठी दिल्ली येथे आयटक वतीने 28 मार्च रोजी देशव्यापी आंदोलन मोर्चा होणार आहे त्यात मोठया संख्येने सहभागी व्हावे. तसेच 8 मार्च रोजी मुंबई येथे राज्यातील आशा व गट प्रवर्तक आंदोलनं आझाद मैदान होणार आहे. यात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांनी अध्यक्षीय भाषणात केलें.

याप्रसंगी विचारमंचावर सुनील नंदवाळकर पोलीस निरीक्षक नंदूरबार, श्रीमती नयना देवरे पोलिस उपनिरीक्षक नंदुरबार, आयुक्त कार्यालय प्रसार डि सोनार, आशा जिल्हा समन्वयक राज्य उपाध्यक्ष वैशाली हिम्मत खंडारे, कॉ. ईश्वर पाटिल भाकप नेते, किसान सभा राज्य अध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी, डॉ. किशोर सुर्यवंशी, स्मिता दोरिक आश नेत्या शिरपूर, कॉ.अरुणा देवरे गट प्रवर्तक धुळे जिल्हा नेत्या, कॉ.वसंत पाटील भाकप आयटक नेते धुळे, प्रमुख पाहुणे कॉ. भीमा पाटील, कॉ. बुधा पवार भाकप जिल्हा सचिव आदि उपस्थित होते.

asha

आयटक वतीने नंदूरबार जिल्हा नेत्या वैशाली खंदारे यांचा उत्कृष्ठ कार्यकर्ता संघटक म्हणुन सन्मान चिन्ह शाल मान्यवर हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटक वतीने नंदुरबार जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. किमान वेतन लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिवेशनाचे प्रास्ताविक वैशाली खंदारे यांनी केले. सूत्रसंचलन रत्ना नंदन यानी केलें आभार गुली पावरा यांनी मानले.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय