घोडेगाव : आदिवासी क्रांती संघटना असाणे आणि असाणे ग्रामस्थ यांच्या वतीने असाणे गावात मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शासकीय आश्रम शाळा असाणे येथील शिक्षक प्रविण शिंदे, आदिवासी समाजसेवक शंकर मुदगुण, देवराम ढवळे, बबन धर्माजी गभाले यांनी जागतिक आदिवासी दिनाविषयी ग्रामस्थांना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर भैरवनाथ ढोल लेझीम पथक, असाणे गावठाण यांच्या लेझीम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यानंतर शासकीय आश्रम शाळा, असाणे येथेही क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी असाणे गाव आणि वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थ, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.