Friday, April 19, 2024
Homeहवामानपावसाचा जोर वाढला, "या" जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, प्रशासनाचाही सतर्कतेचा इशारा

पावसाचा जोर वाढला, “या” जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी, प्रशासनाचाही सतर्कतेचा इशारा

पुणे : राज्यभरात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून विविध रस्त्यांवर पाणीच पाणी झालं आहे. यामुळं मोठ्या प्राणावर वाहतूक कोंडी होत आहे. अशात आता काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाला देखील सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने, पुढील ४ ते ५ दिवस राज्यात सगळीकडे पावसाची शक्यता आहे. त्यात कोकण, गोवा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रासाठी अतिमुसळधार पावसासह जोरदार ते अति मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहेत. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, आजपासून ९ जुलैपर्यंत सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अनेक ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्याही तैनात आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय