Thursday, February 20, 2025

पोलीस जागरुक असतात म्हणून आपण साखर झोप घेतो, भोसरी येथे पोलीस स्थापना दिन साजरा

भोसरी येथे पोलीस स्थापना दिन साजरा

पिंपरी चिंचवड : पोलिस आयुक्तालय – MIDC भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

या निमित्ताने वैष्णवी क्ट्रशन्सचे मालक व प्रसिध्द उद्योजक सामाजिक कार्यकर्ते नवनाथ लोखंडे, विशेष सामाजिक कार्यकर्ते सुर्यवंशी सुरेश बुधेशींग, युवा कार्यकर्ते अमोल दराडे, उद्योजक अमित औटी, निवृत्ती अमुप, खडूं मोरे, रामदास गाढवे आदींसह उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलय व MIDC भोसरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक शिवाजी गवारे यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणुन पोलिस निरीक्षक प्रदिप पाटील साहेब पोलिस हवालदार राजु लिबोंरे व भागवत यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलिसांचा गौरव करताना सामाजिक कार्यकर्ते सुरेश सूर्यवंशी म्हणाले की, ‘पोलिस’ हा शब्द उच्चारताच आपल्या नजरेसमोर उभा राहतो. एका विशिष्ट वर्दीतील सरकारी अंमलदार! काही खास अधिकार असलेला, कायद्याची अंमलबजावणी करणारा, अरेरावी करणारा, उद्धट वाटणारा व समाजामधील लोकांची फारशी सहानुभूती नसलेला हा सरकारी कर्मचारी “पोलिस’ म्हणून ओळखला जातो.

आज महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आहे, याची दखल घेऊन या पोलिसांच्या अहोरात्र कार्याचा गौरव करावा अशी माझी इच्छा झाली, असे सुरेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

2 जानेवारी 1961 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ध्वज प्रदान करून महाराष्ट्र पोलीसची स्थापना केली. पोलीस हे गणवेशातील नागरिक आहेत, ते कायदा सुव्यवस्था राखतात. त्यांना हक्काची विश्रांती नसते. त्यामुळे आपण सर्वजण समाजात सुरक्षित वावरू शकतो. ते जागरूक असतात म्हणून आपण साखर झोप घेत असतो. त्यामुळे मला पोलीस दिवस साजरा करावा असे वाटले असे सुरेश बुधेशींग सूर्यवंशी म्हणाले.

सदरक्षणाय खलनिग्रहणाय ! आज महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त भोसरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक पाटील तसेच कर्तव्यनिष्ठ सर्व पोलीस बांधवाना गुलाबपुष्प देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles