Thursday, April 25, 2024
Homeराज्यट्रायबल वुमेन्स फोरम च्या राज्य महासचिवपदी प्रा. जयश्री दाभाडे - साळुंके यांची...

ट्रायबल वुमेन्स फोरम च्या राज्य महासचिवपदी प्रा. जयश्री दाभाडे – साळुंके यांची नियुक्ती

कळवण / सुशिल कुवर : ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिव पदी प्रा. जयश्री दाभाडे- साळुंके यांची निवड करण्यात आली. त्या जळगाव जिल्ह्यातील रुख्मिणीताई कला व वाणिज्य  महाविद्यालयात इतिहास विषयाच्या विभाग प्रमुख आहेत. ट्रायबल फोरम चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद घोडाम यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.

प्रा. जयश्री दाभाडे – साळुंके यांना अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीचा सावित्रीबाई फुले फेलोशिप अवॉर्ड, खानदेश जनसेवा फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय नारीदीप सन्मान, फॉरएव्हर स्टार इंडिया अवार्ड जयपूर राजस्थान यांच्या तर्फे नॅशनल द रिअल सूपर वूमन अवॉर्ड, वीर राणी झलकारी शौर्य महिला पुरस्कार, खानदेश कस्तुरी गौरव यासह त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

हेही वाचा ! आदिवासी, दलित शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा डॉ. अजित नवले यांचा आरोप, …अन्यथा तीव्र आंदोलन

तर नुकताच कोरोना महामारी च्या काळात केलेल्या जनसेवेबद्दल त्यांना कोरोना योद्धा म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे. अर्ज, निवेदन, आंदोलन, मोर्चे, उपोषण या माध्यमातून त्यांनी आदिवासी समाज आणि इतर समाजाचे प्रश्न सोडववले आहेत. यात  विशेषत: महिलांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत.

आदिवासी बांधवांचे जीवमान उंचवण्यासाठी व त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचाराला वाचा फोडून आदिवासी बांधवांचे जीवन सुखमय व्हावे व आदिवासी बांधवांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ट्रायबल फोरम ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था काम करत आहे. नुकतीच ह्या संघटनेच्या वतीने त्यांनी आजपर्यंत आदिवासी बांधवासाठी केलेले लढे व आदिवासी बांधवांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्यावर केली जाणारी दडपशाही व अन्यायाला ठोस शैक्षणिक क्षेत्रात भेडसावणाऱ्या समस्या व त्यांना शैक्षणिक क्षेत्रात पुढे नेण्याचे काम प्रा. जयश्री दाभाडे- साळुंके यांनी केले आहे.

हेही वाचा ! धक्कादायक : जात पाहुन वकिलाला नाकारले घर 

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरीय चर्चा सत्रे, परिषद, अधिवेशन यातून शोधनिबंध ही प्रा. जयश्री दाभाडे- साळुंके यांनी सादर केले आहेत. त्यांच्या ह्या सामाजिक कार्याची दखल घेत ट्रायबल फोरमने त्यांची नियुक्ती राज्याच्या महासचिव पदी केली आहे.

हेही वाचा ! पुणे : जुन्नर तालुक्यामध्ये रोजगार हमी योजना कायद्याची अंमलबजावणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन

अष्टपैलू व्यक्तिमत्वाची नियुक्ती ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अनेक सामाजिक, शैक्षणिक तसेच राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय