पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बलुचिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला आहे. यामध्ये लष्कराच्या दोन मेजरसह सहा जवानांचा मृत्यू झाला आहे.ही घटना काल रात्री उशिरा हरनाई जिल्ह्यातील खोस्त शहराजवळ घडल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलटदेखील होते. ज्यांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचे समोर आले आहे.
मेजर खुर्रम शहजाद (वय 39) आणि मेजर मोहम्मद मुनीब अफजल (वय 30), सुभेदार अब्दुल वाहिद (वय 44), हवालदार मुहम्मद इम्रान खान (वय 27), नाईक जलील (वय 30) आणि 35 वर्षीय हवालदार शोएब यांचा मृतांमध्ये समावेश आहे.यापूर्वी ऑगस्टमध्येही पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात होऊन सहा जवानांचा मृत्यू झाला होता. टेक ऑफ झाल्यानंतर हे हेलिकॉप्टर काही वेळातच अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे हेलिकॉप्टर लासबेला येथे येथे आढळून आले होते. क्वेटाहून कराचीला जात असताना सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते बेपत्ता झाले होते.
---Advertisement---
---Advertisement---
पाकिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून अपघात !
---Advertisement---
- Advertisement -