Tuesday, January 21, 2025

आळंदीत परिचारिका दिनी परिचारिकांचा सत्कार

आळंदी / अर्जुन मेदनकर : जागतिक परिचारिका दिनानिमित्त आळंदी ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांच्या कार्याचा सन्मान करीत उपस्थित सर्व परिचारिकांचा सन्मान सत्कार करून परिचारिकांच्या कार्याचा आढावा घेऊन परिचारिकांचे कौतुक केले. परिचारिकांमुळे आळंदी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवा प्रभावीपणे देता येत असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी सांगितले.

यावेळी उद्योजक स्थानिक रुग्ण समितीचे संचालक सतीश चोरडिया, उद्योजक मनोहर दिवाणे, राहुल चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुका उपाध्यक्ष रोहन कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, निसार सय्यद, कविता बलचिम, नयना कामठे, शेतकरी बचाव आंदोलनाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पेठकर, महादेव पाखरे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, अनिल जोगदंड, आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका संघमित्रा ओव्हाळ, रुक्मिणी मोरे, वर्षा गाढवे, दीपा लोंढे, सत्वशीला आदी उपस्थित होते.

सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या निरलस रुग्णसेवेचा गौरव म्हणून जगभरात परिचारिका दिन साजरा करण्यात येतो. याच परिचारिका दिनाचे औचित्य साधत १ मे रोजी आळंदी ग्रामीण रुग्णालयात परिचारिकांचा सत्कार आणि भेट वस्तू देऊन कार्य गौरव उत्साहात करण्यात आला. डॉ. उर्मिला शिंदे रुग्णालयाचे कार्याचा आढावा घेत मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

परिचारिका दिना निमित्त उद्योजक राहुल चव्हाण यांच्या हस्ते आळंदी ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व उपस्थितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.उर्मिला शिंदे, बाळासाहेब पेटकर, सौरभ गव्हाणे आदींनी मनोगते व्यक्त केली. आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वतीने संयोजन कविता भालचिम यांनी केले.

हे ही वाचा :

कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

Karnataka Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले काँग्रेसचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘ मेगा ओपनिंग’

“संविधानाची पायमल्ली संवैधानिक मार्गाने होते आहे” – संजय आवटे

जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका

बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Related Articles

- Advertisement -

Latest Articles