Sunday, March 16, 2025

जेएनयूच्या कुलगुरूपदी शांतीश्री पंडित यांची झालेली नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
Photo : Twitter


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राजकारण आणि लोकप्रशासन विभागाच्या प्रोफेसर शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची नुकतीच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जेएनयूचे कुलगुरू जगदेश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने हे पद रिक्त झाले होते. 

शांतीश्री पंडित यांनी जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू होण्याचा मान मिळाला आहे. पंडित यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असणार आहे. त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीही आहेत, असे असले तरी शांतीश्री पंडित यांची नियुक्ती आता वादात सापडली आहे.

ब्रेकिंग : आता सातबारा उतारा बंद होणार, भूमिअभिलेख विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

शांतीश्री पंडित यांनी शेतकरी आंदोलन आणि विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या नरसंहाराचे ट्वीटरवरून समर्थन केले होते. या सोबतच त्याचे इतर वादग्रस्त ट्वीट समोर आल्यानंतर पंडित यांच्या नियुक्तीवर संताप व्यक्त केला जातो आहे. त्यासंदर्भातील ट्वीट शेअर होऊ लागल्यानंतर शांतीश्री पंडित यांनी आपले ट्वीटर अकाऊंट डिलीट केले.

ब्रेकींग : ‘या’ राज्याने केला घरच्या घरी मोफत उपचार देणाऱ्या डायलिसिस योजनेचा शुभारंभ

पंडित यांनी उघडपणे हिंदुत्ववादी विचारसरणीचे समर्थन केले होते. त्यासोबतच त्यांनी विविध घटनांवर वादग्रस्त ट्वीट केलेले आहेत. त्यावरून अनेकांनी त्यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले. यावरून त्यांच्या नियुक्तीचा देखील विरोध केला जात आहे.

पंडित यांनी कंगणा रनौतच्या ट्वीटर अकाऊंट सस्पेंड वेळी टाइम्स नाऊचे संपादक राहुल शिवशंकर यांनी कंगनाच्या ट्विटर हँडलच्या निलंबनाचा निषेध करणाऱ्या टिप्पणीला उत्तर म्हणून शांतीश्री पंडित यांनी डाव्या-उदारमतवाद्यांवर “जिहादी” असे म्हणत टीका केली होती. 

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती

महात्मा गांधींच्या हत्येला दुःखद असे संबोधतानाच त्यांच्या हत्येचे समर्थन करत अखंड भारतासाठी फक्त गांधींची हत्याच उपाय होता, अशी आपत्तीजनक टिपण्णी केली होती.

ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’

याबरोबरच मानवी हक्क कार्यकर्त्यांवर टीका करताना मानसिकदृष्ट्या आजारी जिहादी म्हटले होते.

जेएनयूमधील डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना शांतीश्री पंडित यांनी नक्षली जिहादी असेही म्हटले होते.  

रोहिंग्या मुस्लिमांना देशातून हाकलून देण्याची आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि सेंट स्टीफन्स कॉलेजचा निधी थांबवण्याचे आवाहनही शांतीश्री पंडित यांनी केले होते. 

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा

लव्ह जिहाद, शेतकरी आंदोलन, या सोबतच इतरही घटनांवर शांतीश्री पंडित यांनी खालच्या पातळीच्या टिपण्ण्या केल्या आहेत. तसेच त्यांच्यावर पुणे विद्यापीठातील कामकाजा संदर्भात गंभीर आरोपही करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांची हि नियुक्ती वादग्रस्त राजकीय टिपण्णीने प्रेरीत असल्याची चर्चा आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles