Photo : ANI Twitter |
नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामध्ये सध्या प्रचंड तणाव असून त्यांच्यामध्ये युध्दजन्यस्थिती निर्माण झाली आहे, या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने एका परिपत्रकाव्दारे भारतीय नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितलं की, रशिया १६ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करणार असल्याचं समजतंय. या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या भारतीयांना सुरक्षेच्या कारणास्तव मायदेशी परतावं अस आवाहनं भारतीय दुतावासानं केला आहे. सध्या युक्रेनमध्ये २० हजारांहून अधिक भारतीय आहेत.
रेल्वे मध्ये २ हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा
या संदेशपत्रात दुतावासानं म्हटलं की, सध्याची युक्रेनमधील अनिश्चिततेची स्थिती पाहता इथं असलेल्या भारतीय नागरिकांनी विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना इथं राहणं गरजेचं नाही त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात मायदेशी परतावं.
त्याचबरोबर भारतीय नागरिकांना आवाहन करण्यात येतंय की युक्रेन अंतर्गत सर्व प्रकारचे अनावश्यक प्रवास त्यांनी टाळावेत. भारतीय नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी युक्रेनमधील त्यांच्या वास्तव्याबाबत भारतीय दुतावासाला माहिती द्यावी. यामुळं दुतावासाला भारतीयांना सर्व प्रकारची आवश्यक ती सुविधा पुरवण्यात येईल, असंही या संदेशपत्रात लिहिलं आहे.
उत्तर प्रदेश निवडणूक : सायकलचं बटण दाबलं की, कमळाला मत दिल्याची स्लिप, सपाचा गंभीर आरोप
Embassy of India in Kyiv asks Indians, particularly students whose stay is not essential, to leave Ukraine temporarily in view of uncertainties of the current situation pic.twitter.com/U15EoGu89g
— ANI (@ANI) February 15, 2022
व्हिडिओ : मुंबई- पुणे एक्सप्रेसवे वर ६ वाहनांचा भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू
युक्रेन सीमेजवळ १ लाखाहून अधिक रशियन सैनिक पहारा देत असून रशियाने काळ्या समुद्रात अनेक पाणबुड्या तैनात केल्या आहेत. तसेच मैदानी भागातही आधुनिक शस्त्रास्त्रांसह सैनिकांची संख्याही वाढवली अशा बातम्या येत आहेत.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे कि, रशिया १६ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करणार असल्याचं समजतंय. मात्र, हा आरोप रशियानं पूर्णपणे फेटाळून लावलाय.
“व्हॅलेंटाईन्स डे” ला विरोध करत भर रस्त्यात फाशी, व्हिडिओ व्हायरल