Tuesday, March 25, 2025
---Advertisement---
---Advertisement---

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

---Advertisement---

---Advertisement---

मुंबई, दि. 15 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.  दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरुपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. केंद्र शासनाने सन 2021 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 1 जून 2021 पासून MHRD ( http://www.mhrd.gov.in ) या संकेतस्थळावरील http://nationalawardstoteachers.education.gov.in/newuser.aspx  या लिंकवर नावनोंदणी सुरु झालेली आहे.

शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (नपा/मनपा/जिप) मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळा (प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक) शाळांमधील शिक्षक, पात्र मुख्याध्यापक ऑनलाईन आवेदन भरण्यास पात्र आहेत.

इच्छुक शिक्षकांनी दिनांक 20 जून 2021 पर्यंत राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालय यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles