नाशिक औरंगाबाद महामार्गावर खासगी बस आणि टँकरच्या अपघातानंतर आग लागल्यामुळे बसमधील 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. ती घटना ताजी असतानाच वळी गटावर धावत्या एसटी बसला आग लागली.सुदैवाने वेळीच प्रवाशांनी बाहेर उड्या टाकल्या, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. आज दुपारी नाशिकच्या वणी गडावर ही घटना घडली. नांदुरीहुन वनी गडावर ही बस येत होती. गडाकडे येत असताना अचानक बसला आग लागली.
धावत्या बसने पेट घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली.बसमधील सर्व प्रवाशांनी लगेच बसमधून खाली उड्या टाकल्या. त्यामुळे बस मधील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहे. स्थानिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.