Thursday, April 25, 2024
HomeNewsमहागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 'इतक्या' वाढल्या

महागाईचा सर्वसामान्यांना आणखी एक झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती ‘इतक्या’ वाढल्या

मुंबई : पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे.

मे महिन्याचा पहिल्या दिवशी व्यावसायिक वापराच्या 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 102.50 रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे या सिलेंडरची किंमत 2355.50 झाली आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्येही वाढ झाली आहे. आज जाहीर केलेल्या दरानुसार आता 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरसाठी तब्बल हजार रूपये मोजावे लागणार आहेत.

मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील एलपीजी गॅस सिलेंडरची ही सलग दुसरी दरवाढ आहे. एकाच आठवड्यात झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. भारतामध्ये मागील 10 महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 165 रुपये 50 पैसे महागले आहेत.

Sarkari Naukri: रमन विज्ञान केंद्र व तारामंडल, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 12 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय