Saturday, October 5, 2024
Homeजिल्हाघोडेगाव येथे 'एसएफआय' चा वर्धापनदिन उत्साहात साजरा !

घोडेगाव येथे ‘एसएफआय’ चा वर्धापनदिन उत्साहात साजरा !

एसएफआय च्या झे़ड्यास अभिवादन करताना उपस्थित मान्यवर

आंबेगाव : घोडेगाव येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचाा ५२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी स्वातंत्र्य, लोकशाही, समाजवाद चा झेंडा फडकावून आला. एसएफआय राज्य सचिव मंडळ सदस्य विलास साबळे, नवनाथ मोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी यांनी झेंडाला अभिवादन केले ‌‌‌. 

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांनी एकजूट होणे गरजेचे – विलास साबळे

यावेळी बोलताना विलास साबळे म्हणाले, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया गेली ५२ वर्षे अभ्यास व संघर्षाचा नारा देत सर्वांना शिक्षण, सर्वांना काम या मागणीला घेऊन लढा देत आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी एसएफआय ने रस्त्यावरच्या लढाई बरोबरच न्यायालयीन लढाई लढली आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांनी एकजूट होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन साबळे यांनी केले.

यावेळी एसएफआय आंबेगाव तालुका अध्यक्ष रुपाली खमसे, सचिव समीर गारे, कोषाध्यक्ष दिपक वाळकोळी, राहुल बांबळे, किरण दगडे, गणेश लांघी, मंगेश गाडेकर, बाळकृष्ण गवारी, अक्षय वाळकोळी आदींसह उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय