Saturday, April 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंनी प्रबोधनाचे महान कार्य केले - आमदार मोहिते पाटील

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंनी प्रबोधनाचे महान कार्य केले – आमदार मोहिते पाटील

आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही. लवकरच या स्मारकाचे काम चालू करण्यासाठी पाठपुरावा करू, असे विचार खेड आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती दिवसभर मोठ्या उत्साही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची ग्रंथ दिंडी चे पूजन करून सुरुवात करण्यात आली.

ग्रंथदिंडीचे पूजन साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे अध्यक्ष माजी प्राचार्य नानासाहेब साठे यांनी केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे खजिनदार सुरेश झोंबाडे व सचिव सूर्यकांत खुडे यांनी अर्पन केला. या प्रसंगी आळंदी जनहित फाउंडेशनचे प्रमुख अर्जुन मेदनकर, विक्रम कांबळे, सनी गवई, अनिल पाटोळे, हरिभक्त हनुमंत महाराज, आळंदी पोलीस स्टेशनचे मछिंद्र शेंडे उपस्थित होते.

नगर पालिका चौक येथुन ग्रंथ दिंडीची व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मिरवणूक सुरुवात करण्यात आली. काळे कॉलनी – आळंदी नगरपरिषदेच्या नियोजित स्मारकाच्या जागेत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी, श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, आळंदीतील सेवाभावी संस्था, समाज बांधव दिंडीत सहभागी झाले होते. आळंदीतून दिंडी यशस्वी करण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे व दिघी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, आळंदी चाकण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लहू गीताने साहित्य दिंडीच्या समारोप करण्यात आला. नियोजित स्मारक जागेत प्रतिमा पूजन व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन सभा उत्साहत करण्यात आले.

व्याख्यात्या शिवकन्या प्राध्यापिका श्रद्धा शेटे यांनी आपल्या व्याख्यानात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार व त्यांचे कर्तृत्व आज सर्व जाती धर्माच्या माणसांना प्रेरणा देणारे साहित्य असलेले सांगितले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा लढा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. ही चळवळ अण्णाभाऊंच्या शाहिरीतून समाज प्रबोधन करण्याचे काम हे केलेले दिसून येते. महापुरुषांचे विचार आत्मसात करून घेणे गरजेचे आहे असे त्यांच्या व्याख्यानातून विचार व्यक्त केले. महापुरुषांच्या गीतांचा कार्यक्रम स्वर लावण्य यश लिखे व राजलक्ष्मी लिखे यांच्या टीमने अत्यंत सुंदर असा महापुरुषांच्या गीतांचा कार्यक्रम सादर केला.

कवी संमेलन

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त फाउंडेशन च्या वतीने कवी संमेलन आयोजित करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेविका विनया तापकीर या उपस्थित होत्या. कवी संमेलनाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. या कवी संमेलनात महाराष्ट्रातून कवी आले होते. यात आत्माराम हॉटेल, अमरजीत गायकवाड, रमेश जाधव, मनीषा सपकाळ, माने खंडागळे, सिताराम नरके, हेमलता भालेराव, सवाई लोखंडे, अलका जोशी, शैला जांभुळकर, अनिल नाटेकर, तृप्ती टकले, छाया थोरवे, सारिका माकोडे, साधू जाधव, विकास बोर्डे, कविता काळे, गणेश पुंडे, संतोष गायकवाड, सनी गवई यांचा समावेश होता.

सूत्रसंचालन विश्वजीत साठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विक्रम कांबळे, बाळशीराम पाटोळे, बालाजी पारवे, संतोष सोनवणे, बापूसाहेब वाघमारे, बाळासाहेब पाटोळे, अनिल पाटोळे, बाबासाहेब साधू, वैरागी सनी गवई, अजय मोरे, सुनील पाटोळे, राहुल बाजड, विजय जाधव, दिगंबर रसाळ, विशाल मुजमुले, विजय जाधव आदिनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन फाउंडेशनचे सचिव सूर्यकांत खुडे यांनी केले. आभार उद्योजक फौंडेशनचे खजिनदार सुरेश झोंबाडे यांनी केले. राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय