Sunday, December 8, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAnna Bansode : व्यापारी व सर्वसामान्यांच्या मदतीला धावलो, चुकीचे कोणतेही काम मी...

Anna Bansode : व्यापारी व सर्वसामान्यांच्या मदतीला धावलो, चुकीचे कोणतेही काम मी केले नाही – आण्णा बनसोडे

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : व्यापारी किंवा सर्वसामान्य माणूस कोणालाही त्रास होईल असे चुकीचे कोणतेही काम मी केले नाही. व्यापारी व सर्वसामान्यांसाठी मी कायम तत्पर राहिलो. असे प्रतिपादन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी येथे केले. (Anna Bansode)

अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी पिंपरी कॅम्प व पिंपरी गावात प्रचार फेरी काढण्यात आली. त्यावेळी पिंपरी कॅम्प मध्ये ते बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, नाना काटे, संदीप वाघेरे, शैलेश मोरे, जयश्री गावडे, निकिता कदम, शितल शिंदे, कोमल मेवाणी, जगन्नाथ साबळे, अरुण टाक, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, युवा नेते बबलू सोनकर, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष संजय अवसरमल, असंघटित कामगार शहराध्यक्ष रवी ओव्हाळ, दीपक मेवाणी, आतिश लांडगे, सतीश लांडगे, राजू सावंत, अर्जुन कदम, यश बोद, कुमार कांबळे, मीरा कांबळे, राजू सतेजा, जीतू मंगतानी, बाळासाहेब रोकडे, रमेश शिंदे, प्रवीण वाघमारे, गौतम रोकडे, संतोष वाघमारे, जयेश चौधरी, रेश्मा कांबळे, अक्षय माछरे, नितीन वाघमोडे, भूषण डुलगज, राकेश वाघमारे, निता पाटील, सागर कसबे, सिद्धार्थ बनसोडे, विकास निकाळजे, रवी गोळे आदींनी सहभाग घेतला होता. (Anna Bansode)

लिंक रोड पासून रॅलीला सुरुवात झाली. पत्रा शेड, भाटनगर, आंबेडकर वसाहत, लिंक रोड, रिवर रोड, पिंपरी गाव भागात ही पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार आण्णा बनसोडे म्हणाले की, व्यापारी किंवा सर्वसामान्यांना त्रास होईल असे कोणतेही काम मी केले नाही. उलट नेहमीच मदतीला धावलो. ज्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन बाकी आहे त्यांचे पुनर्वसन येत्या टर्ममध्ये नक्की करून देऊ असे ते म्हणाले.

या पदयात्रेत महिलांनी ठिकठिकाणी आमदार बनसोडे यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच युवक, युवती यांनी पदयात्रेत पुष्पवृष्टी केली. अण्णांनी देखील आवर्जून युवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला भीषण अपघात

अजितदादांसाठी अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात ; व्हिडिओ शेअर करत मतदानाचं आवाहन

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट इशारा, म्हणाल्या…

नारायण राणेंच्या पत्नीने मुलांच्या व नवऱ्याच्या स्वभावाबद्दल व्यक्त केली खंत

महाबळेश्वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकल व बाईक रॅली

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

संबंधित लेख

लोकप्रिय