Monday, December 9, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAnna Bansode : अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे मैदानात...

Anna Bansode : अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे मैदानात उतरले.

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी विधानसभेमधून महायुतीचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे निवडणूक लढवीत असून या निवडणुकीमध्ये अण्णा बनसोडे निवडून यावे म्हणून माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे मैदानात उतरले असून त्यांनी शाहूनगर, संभाजीनगर, विद्यानगर, दत्तनगर, मोहन नगर, या भागात प्रचाराचे राळ उठवली आहे. (Anna Bansode)

कॉर्नर सभा बैठका, विविध समाजाचे प्रमुखांच्या बैठका, मंडळांच्या बैठका, व्यक्तिगत संपर्क करीत यांना बनसोडे यांचा प्रचार करीत आहे.

गेली दहा वर्षांमध्ये अण्णा बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघात लोक हिताची अनेक काम केलेली आहे ती नागरिक पर्यंत पोहोचण्याचा काम ते करीत आहे.


तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून अडीच वर्षांमध्ये झालेली विकासाची कामे, तसेच सामान्य जनतेसाठी आणलेले योजना, यामध्ये लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण, महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सूट, वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत. त्याचबरोबर माहितीच्या काळामध्ये मेट्रो, रिंग रोड, रस्त्याचे जाळ, शास्ती कर माफ, आंध्रा भामा आसखेड पाणी आणले. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, ओबीसी मधील अनेक जातींना आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. इ. इत्यादी कामे ते नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे. (Anna Bansode)


नारायण बहिरवाडे हे लोकप्रिय नगरसेवक आहेत, ते या भागातून तीन वेळा निवडून आल्यामुळे त्यांचा दांडगा संपर्क या भागात आहे. त्याचा फायदा महायुतीचे उमेदवारांना बनसोडे यांना होणार आहे.

अण्णा बनसोडे किती मतांनी निवडून येईल असे विचारल्यावर त्यांनी सांगितले कि, अण्णांनी दहा वर्षात केलेली कामे, तसेच महायुतीचे अडीच वर्षातील लोकहिताची कामे आणि योजना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा नागरिकांना झाल्यामुळे अण्णा चाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून येतील. तसेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येणारअसा विश्वास नारायण बहिरवाडे यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख

लोकप्रिय