Sunday, March 16, 2025

आंध्रप्रदेशमधील कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनासीमा जिल्हा असं नाव ; उसळला हिंसाचार ,बसेस जाळल्या !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

अमरावती : आंध्रप्रदेशमधील कोनासीमा जिल्ह्यात मोठा वाद झाल्याचं समोर आलं आहे. आंध्रप्रदेशमधील कोनासीमा जिल्ह्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनासीमा जिल्हा असं नाव देण्यात आलं आहे. जिल्ह्याचं नाव बदलण्यास विरोध असलेल्या संघटनांनी मोर्चा काढला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांनी सरकारी बस जाळण्यात आली. तर, एका मंत्र्याच्या घराची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आहे. अमलपुरममध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. कोनासीमा साधना समितीच्या सदस्यांची आणि पोलिसांची झटापट जाल्याचं समोर आलं आहे.

आंध्रप्रदेशमध्ये कोनासीमा या नव्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारनं या जिह्याचा नामविस्तार डॉ. बीआर आंबेडकर कोनासीमा असं नाव दिलं होतं. राज्यातील काही समुदायाच्या संघटनांनी याला विरोध केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. विरोध प्रदर्शनाला हिंसक वळण लागलं असून काही ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आहे. तर, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. मंक्षी विश्वरुप यांचं घर पेटवून देण्यात आलं आहे.

दहशतवादी विरोधी पथकाने जुनेद मोहम्मदच्या आवळल्या मुसक्या !

भारतीय मुसलमान आणि मुघलांचा काहीही संबंध नाही, पण हे सांगा की मुघलांच्या बायका कोण होत्या ?

इस्त्रीवल्याचा जुगाड LPG गॅस वापरून करतोय इस्त्री !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles