Friday, March 29, 2024
Homeग्रामीणसुरगाणा तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

सुरगाणा तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

सुरगाणा (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यात शहर व ग्रामीण आदिवासी क्षेत्रात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरासह तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये, ग्रामीण रुग्णालय, जि.प.शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

शहरातील जिल्हा परिषद शाळा सुरगाणा नं. २ या शाळेचे ध्वजारोहण सकाळचे जेष्ठ पत्रकार व जेष्ठ नागरिक रामदास महाले, शहरातील मध्यवर्ती भागातील झेंडा चौक येथील नगरपंचायतीचे माजी सैनिक बळवंत गावित, महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ध्वजारोहण रामदास गवळी, तर पंचायत समितीचे ध्वजारोहण उपसभापती इंद्रजित गावित, पोलिस परेड मैदानावरील तहसिलदार विजय सुर्यवंशी, पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, नुतन विद्या मंदिर येथील प्राचार्य पि.के.चव्हाण, कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य दिघावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पोलिस ठाणे येथील शहिदांचे स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. शिक्षक रतन चौधरी यांनी कोविड लसीकरण, कोरोना विषयक जनजागृती, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तिसरी संभाव्य लाट येऊ नये यासाठी घ्यायची काळजी याबाबत माहिती दिली. कोविड १९ चे नियमांचे पालन करुन कार्यक्रम झाला.

यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र मोरे, गटविकास अधिकारी दिपक पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलिप रणवीर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ललिता नाळे ग्रामस्थ दिपक थोरात, सुरेश गवळी, डॉ. विनोद महाले, भरत वाघमारे, धर्मेंद्र पगारिया, सचिन आहेर, रमेश थोरात, राजुबाबा शेख, छोटू दवंडे, शकूर शहा, राहुल आहेर, दिनकर पिंगळे, शिक्षक रतन चौधरी, सुधाकर भोये, चंदर चौधरी, रमेश राऊत, बाळू बागुल, सुनंदा गायकवाड, भारती ठाकरे, मंगला बागुल, भारती ठाकरे, कमल पवार, भारती राऊत आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय