पिंपरी चिंचवड : भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार आज पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ओम शांतीगंगा विरंगुळा केंद्र, महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान/ओम शांतीगंगा ज्येष्ठ नागरिक संघ व सत्यरंजन डायग्नोस्टिक सेंटर/सूर्य हॉस्पिटलतर्फे रविवारी (दि. २४) रोजी सर्वासाठी आरोग्यविषयक सल्ला व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केला होता. विरंगुळा केंद्रात सकाळी ११ वाजता डॉ. एम डी रुपटक्के, डॉ. दत्तात्रय सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराला सुरुवात झाली.
या शिबीरात अत्यल्प दरात तपासणी व उपचार, आरोग्याबाबत मोफत सल्ला व मार्गदर्शन केले व हे आरोग्य शिबिर ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुर्या हॉस्पिटल कृष्णानगर, चिंचवड येथे नागरिकांसाठी खुले असणार आहे. हे शिबिर “सशक्त भारत, सुदृढ भारत” या उद्देशाने संपन्न होणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे सचिव शिवानंद चौगुले यांनी केले आहे.
ओम शांतीगंगा नागरिक संघाचे अध्यक्ष यशवंत कान्हेरे यांनी प्रास्ताविक केले व विश्वास सोहनी यांनी आभार व्यक्त केले. प्रसंगी सचिन सानप, मनीषा गटकळ, राधाकिसन चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.