Saturday, October 12, 2024
Homeआंतरराष्ट्रीयअमरावती ते अकोला या रस्त्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद...

अमरावती ते अकोला या रस्त्याची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद ! वाचा काय आहे कारण

पुणे :  अमरावती ते अकोला हा मार्ग इतका खराब झाला होता की प्रवाशी अक्षरशः कंटाळले होते. पण हा अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील 75 किलोमीटरचा रस्ता अवघ्या पाच दिवसात पूर्ण झाला आणि अखेर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये याची नोंद झाली आहे.

सरकारी नोकरी : इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत 8106+ जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे. काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे.

अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे विक्रमी बांधकाम 3 जूनपासून सुरू झाले असून 7 जून रोजी हा 75 किमीचा रस्ता बांधून पूर्ण झाला. 5 दिवसात 75 किमीचा रस्ता तयार करण्यासोबतच या कामाची नोंद गिनीज बुकमध्ये देखील झाली. राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून महामार्गावरील लोणी ते बोरगावमंजू या 75 किमी रस्त्याचे बांधकाम बिटूमिनस काँक्रीट पद्धतीने झाले. यावेळी गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सिंधुदुर्ग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 8 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय