पुणे / केशव पवार : बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका महासचिव पदी विनायक धादवड व कोषाध्यक्ष विलास लाडके यांची निवड आज दि.११ ऑक्टोबर २०२१ रोजी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल संघटनेचे राज्य अध्यक्ष रंगराव काळे, राष्ट्रीय महासचिव बाबासाहेब कंगाले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डी. बी. अंबुरे, महाराष्ट्र राज्य सचिव चिंधू आढळ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, जिल्हा, उपाध्यक्ष प्रा, संजय मेमाणे, जिल्हा कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे, महासचिव किरण तळपे, सचिव शशिकांत आढारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष सुरेश वाळकोळी, उपाध्यक्ष सागर भवारी, कोषाध्यक्ष संदिप भवारी, सचिव कुमार शिंगाडे, सुरेश किरवे, संघटक अजित गवारी, महिला आघाडी उपाध्यक्ष गौरी चपटे आदीसह ऑनलाईन उपस्थित होते.