घोडेगाव : कुरवंडी ता.आंबेगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी २११ झाडांची लागवड करण्यात आली आहे.
वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपन यांचे महत्व ओळखून वेताळे ता.खेड येथील १४ ट्रीज ही संस्था मागील काही वर्षे वृक्षारोपण व वृक्षसंगोपन याकामी मूलभूत काम करत आहे. या संस्थेच्या सहकार्याने व ग्रामपंचायत कुरवंडी यांच्या समनव्यातून व पुढाकाराने, सामाजिक बांधिलकी जपत सुमारे २११ झाडांची रोपे लावण्यात आली.
हे वाचा ! घरगुती गॅस हजारीकडे, महागाईने जनता त्रस्त
ही झाडे कुरवंडी गावातील, हरिश्चंद्र तोत्रे विद्यालय परिसरात व गावातील स्मशानभूमी परिसरात लावण्यात आली. या झाडांना संरक्षण जाळी ही लावण्यात आली आहे, तसेच झाडांना तातडीने टँकरच्या मदतीने पाणी ही देण्यात आले. या कार्यक्रमासाठी १४ ट्रीज संस्थेचे अनंत तायडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी कुरवंडी ग्रामपंचायत सरपंच मनीषा तोत्रे, १४ ट्रीज संस्थेचे कल्पेश इंगळे, दीपक कोबल व याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते डॉ.अमोल वाघमारे, हरिश्चंद्र तोत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुर्वे, गायकवाड, गवारी, दरेकर, अभिषेक घोडेकर, अंकिता ढमढेरे, सुनील तोत्रे, जयसिंग तोत्रे, तुषार तोत्रे, देवेंद्र तोत्रे, रमेश तोत्रे, दिलीप मते, अरुण तोत्रे, मारूती जाधव व विद्यार्थी उपस्थित होते.
हे वाचा ! एसटी महामंडळाला ५०० कोटी वितरित, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार